पुसद शहरातील नाईक चौक ते जाजू हॉस्पिटलच्या दरम्यान दिनांक 19 ऑगस्ट रोजी च्या रात्री अजय पद्मावार यांची दुचाकी वाहनास भरधाव वाहनाने ठोस मारल्याने अपघात होऊन सदर अपघातामध्ये अजय पद्मावार यांना मार लागुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर घटने संदर्भात 22 ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.