धुळे शहरातील गणेशोत्सव डीजेमुक्त, शांततेत आणि उत्साहात यशस्वीपणे पार पडल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिक, गणेश मंडळे आणि पोलीस दलाचे आभार मानले. न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे-लेझरवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पारंपरिक वाद्यांद्वारे संस्कृती जपणाऱ्या मंडळांचे कौतुक केले. धुळेकरांच्या समजूतदारपणामुळे यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरल्याचे धिवरे यांनी सांगितले.