पोलिसांचा पाथर्डीतील दारू अड्ड्यांवर छापा; चार जणांवर गुन्हे दाखल पाथर्डी: पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाडळी गावात आणि शेवगाव-तिसगाव रोडलगत दोन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या चार जणांवर कारवाई केली. याप्रकरणी चार व्यक्तींना अटक करण्यात आली. यामध्ये एकूण सुमारे २४ हजार रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.