जिल्ह्यातील कोठारी गावातून एक अतिशय वेदनादायक बातमी समोर आली आहे.आज दि.8 सप्टेंबर रोजी गावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. एवढेच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.