अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे कारवाई करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कुर्डू येथे गेल्या होत्या. दरम्यान, यामागचा सूत्रधार कोण आहे, ते तपासावे अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. ते आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते.