आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३५ मिनिटाच्या सुमारास मुंबईतील सर्वात मोठ्या नवरात्री उत्सव २०२५ च्या भूमिपूजन कार्यक्रम बोरिवली येथील कोरा केंद्र मैदान क्र ४ येथे संपन्न झाले. शोग्लिट्झ द्वारे आयोजित या भव्य उत्सवात लोककलावंत गीताबेन रबारी यांच्या सुरेल गाण्यांनी नवरात्रीच्या उत्साहाला नवी ऊर्जा लाभणार आहे. याप्रसंगी आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, शिवा शेट्टी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या नवरात्री उत्सवाचे आयोजक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.