दहा दिवसाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज दिनांक सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कामठीकरांनी महादेव घाट येथे गणपती बाप्पाचे विसर्जन केले. यादरम्यान महादेव घाट येथून वाहणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे तेथे बॅरिकेड देखील लावण्यात आले होते. यादरम्यान पाणी प्रदूषण होऊ नये यासाठी लायन्स क्लब आणि नगरपरिषद कामठी यांच्या सहयोगाने सर्व निर्माल्य बाहेर काढून फक्त बाप्पाचे विसर्जन येथे केले. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात कामठीकरांनी गर्दी केली होती.