श्रीगोंद्यात चालत्या बसमधून अचानक धूर; प्रवाशांची धावपळ, श्रीगोंदा शहरातील नायरा पेट्रोल पंपाजवळून नगरकडे जाणाऱ्या बसमध्ये आज दुपारी १२:१५ वाजता अचानक इंजिनमधून धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे बसमधील प्रवासी मोठ्या घाईगडबडीत खाली उतरले. परिसरातील नागरिकांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना मदत केली. धूर पाहून पेट्रोल पंप परिसरातील नागरिक आणि प्रवासी काही काळ घाबरले होते.