24 ऑगस्टला सायंकाळी सहा नागपूर शहरातील संतीच्या गणपतीचे बरकत चौकात भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागतामध्ये ढोल ताशा पथक व इतरही पथक सहभागी झाले होते. दरवर्षी संधीच्या गणपतीसाठी विविध देखावे करण्यात येतात यावर्षी येथे श्री जगन्नाथ मंदिर जगन्नाथ पुरी ओडीसा ची प्रतिकृती असणार आहे. दरम्यान यावेळी बाप्पाचे शेकडोच्या उपस्थितीत असणाऱ्या भाविकांनी भव्य स्वागत केले. यावेळी उत्साह नागपूरकरांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.