सांगलीत मुस्लिम बांधवांकडून ढोल ताशाच्या गजरात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची जपणूक केली. त्याच परंपरेतून आजही सांगली शहरात हिंदू–मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे. गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सलग २५ वर्षांपासून ही परंपरा उत्साहात साजरी होत असून यंदाही ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. या प्रसंगी डॉ. उत्तमदादा मोहिते उपस्थि