जिवंत विजेची तार तुटून खाली जमिनीवर पडल्याने त्याच्या संपर्कात संगम येथील गोपालकाच्या दोन गाई आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वेळीच वीजप्रवाह बंद केल्याने आठ गुरे थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वानाडोंगरी संगम मार्गालगत घडली.वानाडोंगरी संगम गावाला जोडणाऱ्या मार्गाशेजारी महावितरणच्या सर्व्हिस लाइनची तार सकाळी एका अज्ञात वाहनाला अडकून तुटली. ती तशीच पडून राहिली.