माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या फिट इंडिया मिशन अंतर्गत आज आयोजित रविवारी सायकलवल्लभ या विशेष मोहिमेला आमदार मिलिंद नरोटे यांनी हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल तसेच तंदुरुस्त आणि निरोगी भारत घडविण्यासाठी नक्कीच हातभार लागेल.