आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुंबईतील महाआयटी, चर्चगेट येथे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात साजरा होणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षे 'सार्धशताब्दी महोत्सव' कार्यक्रमाच्या नियोजनावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.