आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सवानिमित्त रामटेक शहरात व ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून मंगळवार दि. 26 ऑगस्टला दु. दोन वाजताच्या दरम्यान पो. स्टे. रामटेक येथून रामटेक पोलिसांनी रामटेक शहरातील मुख्य रस्त्यांवरून शांतता पथ संचालन केले. तसेच गांधी चौक सह शहरातील काही मुख्य चौकात प्रात्याक्षिक ही करण्यात आले.दु.तीन वाजता पोलीस स्टेशन रामटेक येथे संचलनचे समापन करण्यात आले.