संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे 28 ऑगस्ट रोजी विनयभंगाची केस मागे घेण्यासाठी दोन गटांत झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू तर चौघे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ऋषिकेश सुभाष मोहे असे मृतक युवकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्वल मोहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगलसिंग सोळंके, जीवनसिंग सोळंके, वैभव सोळंके, अमोल सोळंके, सूरज सोळंके, आकाश सोळंके, ईश्वर उर्फ बारक्या सोळंके, मानसिंग सोळंके आदी विरुद्ध तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.