5 सप्टेंबरला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतील पाटणकर चौक येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मधून अज्ञात आरोपीने एटीएम फोडून आठ लाख 12 हजार चारशे रुपये चोरून नेले. ही घटना दिनांक 4 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजता च्या सुमारास घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे..