पालघर तालुक्यातील बोईसर येथे शिवसेना व आधार प्रतिष्ठान त्याचप्रमाणे पालघर जिल्हा अथलेटिक्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बोईसर वर्षा मॅरेथॉन 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्लीन बोईसर ग्रीन बोईसर हे ब्रीदवाक्य घेऊन ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला पाच हजारहून अधिक धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले.