फिर्यादी आशिष जाधव यांच्या तक्रारीनुसार आरोपी बादल राठोड व आणखी दोन अशा तिघांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत असताना फिर्यादीने त्यांना हटकले असता आरोपींनी काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.ही घटना नेर तालुक्यातील सोनवाढोना येथे घडली. याप्रकरणी 27 ऑगस्टला लाडखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.