माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते आज शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माळशिरस येथील फुलेनगर येथे भांडी संचाचे वाटप करण्यात आले. हा वाटप कार्यक्रम बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बांधकाम कामगार मजुरांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.