आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी 5:50 च्या सुमारास मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेना शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुखाच्या निवडी संदर्भात अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी गणेश सानप प्रवीण कोकाटे नीलम पवार रेखा सुरनकर यांची उपमुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली असून या सर्वांचा अभिनंदन कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.