लोणार येथील शेकडो वर्षे जुने आराध्य दैवत कमळजा देवीचे मंदिर जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या आत वसलेले आहे. पंचक्रोशीतील हजारो भाविक नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.