शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला बैल पोळा सण अहमदपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी आपला लाडका सण, बैलपोळा, मोठ्या उत्साहात साजरा केला. यंदा पावसाने चांगली साथ दिली असल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. याच आनंदात शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची विशेष पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावर्षीच्या पोळ्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना मोठ्या उत्साहात सजवले. त्यांच्या शिंगांना रंग लावून आकर्षक बनवले