मिरजोळे येथील भक्ति मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील यांनी तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला होता. यापूर्वी दुर्वास व त्या दोघां साथीदाराने भक्तीच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी दुर्वासने खंडाळा येथील एका उकिरड्यावर हे दागिने फेकून दिल्याची माहिती आता पोलीस तापाचा समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भक्तीचे दागिने दुर्वासने फेकलेल्या ठिकाणाहून जप्त केल्याचे सांगितले.