सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना बुधवारी सकाळी ११ वाजता मुहूर्तावर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या निवासस्थानी सावित्री या बंगल्यामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना विधीवत पद्धतीने करण्यात आली. यावेळी त्यांचे पती, त्यांची मातोश्री आदी मान्यवर उपस्थित होते. गणपतींची आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपतीची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. I