पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलत सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय, पुणे विभाग यांच्यात महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली.या कराराअंतर्गत तालुक्यातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर या वनक्षेत्रामधील विदेशी जंगली वृक्ष काढून टाकले जाऊन, त्यांच्या जागी भारतीय स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचीलागवड केली जाणार आहे.