आरोग्य विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या महिलेसोबत आक्षेपार्ह्य वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी वाढता रोष पाहून जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. वाढता दबाव आणि सामाजिक तणावामुळे ही कारवाई करण्यात आली असून प्रकरण अधिक गंभीर वळन घेण्याची शक्यता आहे. मुरमाडी तुपकर परिसरातील आरोग्य केंद्राशी संबंधित एका व्हिडिओमध्ये एक अधिकारी निर्जन ठिकाणी महिलेसोबत आक्षेपार्ह्य अवस्थेत दिसल्याने जिल्ह्यात संताप उसळला आहे.