नाशिक ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या चाकरमान्यांची आवडत्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये आता भारतातील पहिले रेल्वेगाडी मधील एटीएम बसवले जाणार असल्याची माहिती नाशिकरोड येथे मध्य रेल्वे सूत्रांनी आज दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता दिली आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड येथील वर्कशॉपमध्ये पंचवटी एक्सप्रेसमध्ये एसी कोजच जवळ बँक ऑफ महाराष्ट्राच्यावतीने ही एटीएम सेवा सुरू केली जाणार असून भारतात प्रथमच असा प्रयोग होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले