आज दि 9 स्पटेंबर रोजी सांयकाळी सात वाजता खुलताबाद पोलिसांनी माहिती दिली की खुलताबाद कागजीपूरा जवळ एम.आर. ढाबा मोटारसायकल (MH 20 CU 9598) व रीक्षा (MH 20 EF 2268) यांची भीषण टक्कर होऊन एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात शेख हारिस शेख शगीर (24, रा. कन्नड) याचा जागीच मृत्यू झाला असून यश स्वप्निल निकम (17, रा. राजवाडा, कन्नड) हा गंभीर जखमी झाला आहे. हारिस हा घरातील एकमेव कमावता सदस्य होता.