जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि नवरंग क्रीडा मंडळ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले या स्पर्धा. या कबड्डी स्पर्धा 50 ते 52 किलो गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील बहुतांश कबड्डी संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आमदार श्याम खोडे यांनी 31 हजार रुपये पहिले पारितोषिक ठेवले होते तर दुसरे पारितोषिक भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनीष मंत्री यांनी 21000 रु. ठेवले.