कुलर सुरू करण्याचा प्रयत्न करीत असतांना एका 15 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना ता. 25 सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तालुक्यातील धामणगाव येथे घडली. किशोर विठ्ठल बावणे रा. धामणगाव असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळी 5.30 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.