सांगलीत पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन ....प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची संमेलनाला उपस्थिती सांगलीत पहिले शाहिरी लोककला संमेलन पार पडते आहे. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची या लोककला संमेलनाला प्रमुख उपस्थिती आहे. या लोककला संमेलनामध्ये राज्यभरातून 200 हुन अधिक लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत. दिवसभर हे लोककला संमेलन सुरु राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात गोंधळ आणि अन्य लोककलानी करण्यात आले.