आज दि २८ स्पटेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नडच्या आमदार संजना जाधव व राज्य सरकारांवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडे फक्त निवडणुकीसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगणारे सरकार मग केंद्राकडे भिक का मागते, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.