वैजापूर पोलिस ठाण्यात गहाळ तक्रार नोंद असलेले पाच मोबाईल शोधून वैजापूर पोलिसांनी मूळ मालकाला परत केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रावसाहेब रावते व पोलिस अमलदार गणेश कुलट यांनी वैजापूर पोलिसांत गहाळ तक्रार नोंद असलेल्या पाच मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास लाऊन सदरील मोबाईल हे कन्नड, टाकळीसागज, अवलगाव,नाशिक, सुराळा येथून शोधून आणले.