राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आंदोलन सतराव्या दिवशीही सुरूच; आरोग्यसेवा ठप्प? विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज सतराव्या दिवशीही ते कायम आहे. १९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल शासनाने अजून घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नियमित सेवेत समावेश, वेतनवाढ, पदोन्नतीसह विविध सुविधा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या माहितीनुसार, शासनाने