अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील लक्ष्मीनगर येथे आज सकाळी आठ वाजता एका महिलेवर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. माजी नगरसेवक निखील वारे यांनी महापालिके विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.