राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनातील तब्बल सात कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची अधिक सखोल चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दिली.