महाराष्ट्राचा राज्य महोत्सव श्री गणेशोत्सवाचा कालपासून मोठ्या उत्साहात आरंभ झाला आणि दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी मुख्यमंत्री महोदयांचे हार्दिक स्वागत, सत्कार करून महाले परिवारांनी धन्यवाद व्यक्त केले.