कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथे गोदावरी नदीतिरी असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची दिनांक २३ डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन गाव बंद ठेवले असता आज २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वा.कोपरगाव येथील हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तालुका पोलीस ठाणे येथे निषेध करण्यात आला.कोपरगाव शहर व तालुक्यातील घटनांकडून पोलीस प्रशासना निवेदन देण्यात आले.या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.