पाकिस्तानने भारतात दहशतवादी हल्ले घडवूनही काँग्रेस सरकारने पाकिस्तानला भारतात खेळण्यास आमंत्रित केले होते. काँग्रेस सरकारच्या पाकिस्तान संघाला भारतात बोलावण्याच्या निर्णयामुळेच 1991 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियम ची खेळपट्टी उखडली होती, याचे सोईस्कर विस्मरण उबाठाचे खा. संजय राऊत यांना झाले आहे. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते राऊत यांना स्मृतीभ्रशांचा झटका आल्याचा सणसणीत टोला भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी सकाळी १० च्या सुमारास राऊत यांना लगावला.