बाभूळगाव शहरासह तालुक्याला परतीच्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे.त्यामध्ये पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पाण्यामध्ये आहे. कापसाची बोंडे सुद्धा काळी पडत आहे.यामुळे शेतकरी वर्ग मेटाकूटीला आला आहे.शेतकऱ्या सोबतच मजूर वर्गावर सुद्धा आर्थिक संकट ओढवले आहे.तालुक्यातील नद्या आणि नाल्या तुडुंब भरून वाहत आहे.अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.