गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशोत्सवासाठी खरेदी करणाऱ्या रत्नागिरी घरांची पावले बाजारपेठेकडे वळली आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे रत्नागिरी शहरातील बाजारपेठांमध्ये लगभग वाढली असून बाप्पांच्या स्वागतासाठी विविध वस्तू आणि साहित्याने दुकाने सजली आहेत.