23 ऑगस्टला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पंकज गुरव त्याच्यासोबत त्याचा मित्र प्रतीक देवगिरकर वय 27 वर्ष व गावातील इतर चार ते पाच युवक महिंद्रा गाडीने जामसावळी येथे जात असताना पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील जबलपूर हैदराबाद हायवे तरोडी गावाजवळ प्रतीक यांना लघुशंका आल्याने गाडी थांबवून तो लघुशंकरिता गाडीच्या खाली उतरला असता अज्ञात ट्रक ने त्याला धडक दिली. व पळून गेला अपघातात प्रतीक हा गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.