कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्या अडाण धरणातील पाणीसाठ्यात मागील काही दिवसाच्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे दि. 30 ऑगस्ट रोजी अडाण धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी अडाणा नदीपात्रात 165.49 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु असून, त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.