नंदुरबार जिल्ह्यातून गहाळ झालेले १०७ मोबाईल मूळ मालकांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे. सायबर सेल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे पथक यांच्या अनुषंगानं या गहाळ झालेल्या मोबाईलचा जिल्ह्यात व जिल्हा बाहेरून तपास करत शोध मोहीम राबवत मिळविले आहेत.