9 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान लष्करी बाग येथे लोकांनी तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव आतिष शिंदे असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक पाचशे रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.