नांदुरा तालुक्यातील जुनी येरळी गावात एका शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेनंतर जखमी पतिपत्नीने नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार इंगळे करीत आहेत.