23 ऑगस्टला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी जैन, पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या उपस्थितीत उमरेड पोलिसांनी आज भव्य रूट मार्च काढला. दरम्यान दंगा काबू योजनेबाबत सराव देखील घेण्यात आला यामध्ये एकूण चार अधिकारी ५१ अंमलदार आणि गृहरक्षक उपस्थित होते. सणासुदीच्या दिवसात शहरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी हे प्रात्यक्षिक केले आहे.