अंचरवाडी येथे 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी अंचरवाडी – भरोसा गावाला जोडणाऱ्या पुलाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. सततच्या पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने गावांचा संपर्क तुटत असून शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.या पाहणीदरम्यान मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.