सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ वाद्यवृंद वाजविण्याचे निर्बंध यशस्वीपणे पाळल्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. ते शनिवारी दुपारी 4 वाजता सोलापुरात मध्यवर्ती गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूजन प्रसंगी बोलत होते. पालकमंत्री गोरे म्हणाले की, सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा विचार करत सारे गणेश मंडळांनी DJ मुक्त विसर्जन मिरवणूक काढून सकारात्मक भूमिका घेतली आहे.