शहादा पंचायत समिती येथे कार्यरत कृषी अधिकारी राजू पेंढारकर यांनी आदिवासी लाभार्थ्यांना बिरसा मुंडा सिंचन विहीर योजने पासून वंचित ठेवल्याच्या आरोप करीत त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी बिर्सा फायटर संघटनेने केली होती. मागणीची दखल घेत कृषी अधिकारी राजू पेंढारकर यांची जळगाव येथे बदली करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे.